गहू लागवड Android

गहू लागवड

गहू लागवड व व्यवस्थापन गहू पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

Features & Capabilities

गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ३० टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्‍नधान्य पीक आहे. जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारत जगात दुसर्‍या स्थानावर आहे गहू या पिकाबद्दल माहिती घेण्या अगोदर गहू हे पिक आपण घ्यावे कि नाही? या प्रश्नाचे उत्तर शेतकरी बांधवांनी जाणून घ्यायला हवे. घ्यायचा असेल तर किती क्षेत्र या पिकास द्यावे? व उत्पादनाचे काय लक्ष्य ठेवावे? हे मुद्दे देखील अतिशय महत्वाचे आहेत. कोणकोणती पिके घेतली जावू शकतात? इतर कोणते पिक आपण घेवून आपण चांगला नफा कमवू शकतो का? आपल्याकडे एकूण किती क्षेत्र आहे? मृदेची अवस्था काय? कोणत्या पिकासाठी बाजारपेठ अनुकूल आहे? कोणत्या पिकापासून किती उत्पादन येईल? शाश्वत उत्पन्न किती? पाणी साठा किती? सर्वसाधारण वातावरणाचा कल कसा असणार आहे? मनुष्यबळ किती उपलब्ध आहे? यापूर्वीचा आपला काय अनुभव आहे? गहू पिक घ्यायचे असेल तर कोणते वाण निवडावे? गहू कोणत्या ग्राहकासाठी घ्यायचा? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक शेतकरी बांधवासाठी वेगवेगळी असतील. असा चौफेर विचार करून निर्णय घ्यावा. महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. या पिकाखाली सन २०१६-१७ मध्ये १०.७३ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून १६.७२ मे. टन उत्पादन मिळाले. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १५५८ किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३१.७२ क्वि./ हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे आणि गव्हाची उशिरा पेरणी करणेही आहेत.

जमीन
बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल, जिरायत गहमात्र जास्त पाऊस पडणाऱ्या व जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी अशा जमिनीतच घ्यावा. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

मशागत
गहू पिकाच्या मुळया जमिनीत ६० ते ७५ सें.मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुसीत जमिनीची निवड करावी. त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात गव्हाची लागवड खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर करतात. खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० से नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळया देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १०ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारित वाण
पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरून १२९२ किलोपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात भात पिकानंतर गव्हाची पेरणी करतात. अशा पीक पध्दतीत गहू घ्यावयाचा असल्यास आणि २-३ पाण्याच्या पाळयांची सुविधा असल्यास निफाड-३४ हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. त्यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे. एन आय ए डब्ल्यू-३०१ (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू-९१७ (तपोवन), एम ए सी एस-६२२२ हे सरबती वाण व एन आय डी डब्ल्यू-२९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-३४ आणि एके ए डब्ल्यू-४६२७ या वाणाप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू-१५ (पंचवटी) एकेडी डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आय.ए.डब्ल्यू-१४१५ (नेत्रावती) व एच.डी. २९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल. )

User Growth & Download Statistics

App
By:
𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
Downloads:
13
Version:
4.0 Last updated: 2024-01-19
Version code:
4
Creation date:
2022-04-12
Publisher country:
IN IN
Permissions:
  • com.google.android.gms.permission.AD_ID Moderate risk
  • android.permission.ACCESS_ADSERVICES_AD_ID Low risk
  • android.permission.ACCESS_ADSERVICES_ATTRIBUTION Low risk
  • android.permission.ACCESS_ADSERVICES_TOPICS Low risk
  • android.permission.FOREGROUND_SERVICE Low risk
  • android.permission.INTERNET Low risk
  • android.permission.WAKE_LOCK Low risk
  • android.permission.ACCESS_NETWORK_STATE Safe
  • gahu.lagwad.DYNAMIC_RECEIVER_NOT_EXPORTED_PERMISSION
Size:
7.31MB
Email:
He*****@agrowone.com
URLs:
Website ,Privacy policy
Full description:
See detailed description
Source:
Google Play Store
Data ingested on:
2026-06-12
Compare stats and ranking:

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=gahu.lagwad
Email:
He*****@agrowone.com
Website:
https://agrowone.com

Best गहू लागवड Alternatives

Here are some Android apps that are similar to गहू लागवड: